मुक्ताई

मुक्ता साळवे यांच्या मांग महाराच्या दु:खाविषयी निबंद याच्यातुन घेतलेला हा लेख आहे
वयाच्या चौदाव्या वर्षी सन १८५५ साली.ईथल्या रूढीपरंपरने,आनिष्ट धर्मरूढीने दीलेले मांगा महाराला दु:ख तिने हातात लेखीन घेऊन मांडले.आणि आज सूद्धा तो मुक्ताई चा निबंध आज सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतायत?????

आता जर वेद आधारेकरुन आमचा व्देष करणारे लोक यांच्या मताचे खंडण करावे तर आम्हापेक्षा उंच विशेषकरून लाडुखाऊ ब्राम्हण लोक आसे म्हणतात,की वेद तप आमचीच मत्ता आहे.आम्हीच याचे आवलकन करावे.तर यावरून ऊघड दिसते,की आम्हास धर्मपुस्तक नाही.जर वेद ब्राम्हणासाठी आहेत,तर वेदाप्रमाणे वर्तणुक करणे हा ब्राम्हणा धर्म होय.जर आम्हाला धर्मसंबधी पुस्तके पाहण्याची मोकळीक नाही,तर आम्ही धर्मरहीत आहोत आसे साफ दीसते की नाही बरे! हर हर ,आसे जे वेद,की ज्याचे आवलोकन केल्याने महापातक घडते,तर मग त्याच्या आधारें आचरण केल्याने आम्हाकडेस कीती मुर्खत्व येईल बरे? व ईग्रज लोक बैबलाच्या आधारेंकरुन आणि ब्राम्हणलोक वेदाधारेकरुन चालतात,म्हणुनच ते आपल्याला खर्याखोट्या धर्माप्रमाने जास्तकमी आम्हपेक्षा सुखी आहेत आसे वाटते.
तर हे भगवान,तुजकडून आलेला कोणता धर्म तो आम्हास कळीव,म्हणजे आम्ही सर्व त्याचा सारिख्यारीतीने आनुभव घेऊ,पंरतु ज्या धर्माचा एकानेच आनुभव घ्यावा व बाकीच्यांनी खादाड मनुष्याच्या तोंडाकडेस पाहावें,तो व त्यासारखे दुसरे धर्म प्रुथ्वीवरून नष्ट होतील व आशा धर्माचा आभिमान करावा आसे आमच्या मनातदेखील न येवो.
उदक हे ईश्वराची देणगी आहे,त्याचा उपभोह सर्व गरीबापासुन श्रीमंतापर्यत एकसारखी घेता येतो,परंतु वेद हे देवाकडुन जर आले म्हणावे तर याचा आनुभव ईश्वराकडुन उत्पन्न झालेल्या मनुष्यास घेता येत नाही.काय ही आश्र्चर्याची गोष्ट! याविषयी बोलायास देखील लाज वाटती

हा लेख मांगा महाराच्या दु:खाविषयी निबंध याच्यातुन घेतलेला आहे.
लेखीका- मुक्ता साळवे( मुक्ताई)


Comments

Popular posts from this blog

रान उनाड

सावधान

मातंग समाजाची झेंड्याविषयीची गफलत