सावधान
मांगानो सावधान धोक्याची घंटा
तुम्हचा व्यवहार,तुम्हचे काम चोरी झालाय आणि चोरी होतोय.
तुम्ही गावोगावी जाऊन वाजवुन खायायच काम चोरी होतोय.जे काम तुम्हच्या खिश्यात चार पैसे पाडत होत ते पळतय.तुम्हचच काय सार्याच जातीची कामे चोरी झालेत. चांभाराच चप्पल शिवन, कुभाराच मडके बनवन, गवड्याच घर बांधन,न्हाव्याच केस कापन सारच.आता कोनीही कोनतही काम करतय.
जेव्हा पासुन या देशात बाबासाहेब जन्माला आले तेव्हा पासुन सारच बदलय.जाती नुसार काम बंद झालेत.
तुम्हालाही माहीत आहे सद्या मोठ्या मोठ्या बॅन्ड पार्ट्या ह्या मोठ्या लोकांनच्या आहेत म्हणजे परजातीयाच्या ते एक्या कार्यक्रमात ८०ते ९०हजार कमवतात.
आजच्या घडीचा विचार केला तर जास्तीत जास्त मांगाच्या घरी बॅन्ड बाजा आहे .खरतर सार्याच्याच घरी.आणि ज्याच्या घरी बॅन्ड नाही तिथला वाजवनारा असतोच.आपल्या छोट्या छोट्या पार्ट्या आहेत जे जास्तीत जास्त १५ ते २० हजार कमवतात.आता त्यातल प्रत्येकाला कीती येत तुम्हाला माहीतच आहे.कोनाला सुपारी भेटते तर कोनाला भेटत नाही.एक पार्टी २ नसता ३ लग्न वाजवते.
आम्हच्या गल्लीत ईतकी ऊस्तुकता असते की सारे लहान मुल लोखंडी डबे,खोके,खपटे गळ्यात अडकवुन मस्त वाजवत असतात.लहानपणीचा आम्हचा तोच खेळ जे भेटल ते वाजवन.लग्नात आयेर करताना नविन ढोतरात खपटा येतो.
तो घेण्यासाठी आयेराच्या ठीकानी सार्या लहान मुलाचा घोळका असतो.तो खपडा बाजुला झाला की तो कड्यावर मस्त हालगी घेतल्या सारख वाजवायच.वाजवण्याची आवडच जास्त कारण घराच्या आजुबाजुचे सारेच वाजवतात ना .
जत्रेत जर गेल तर ह्याच ट्रक, कार,विमान अस्या खेळण्याकड लक्ष जात नाही तो बाजारातुन ढोल आणतो ढोल.आवडच ती.
तीकडे शाळेचा बोंब.शिक्षणात रस नाही.असाच वेळ जातो.मग १२,१३वर्षाच झाल की कधी कधी वाजवायला जात.घराच्याना तर वाटत पोरग शिकाव पण त्याच्यावर दबाव टाकत नाहीत.ज्यास्तीत जास्त प्रमाणात सद्या असच होतय.शिकलेले वडील शिकवतातच ते ईकडे येत नाहीत.
बाबासाहेब एका सभेत भाषणात म्हणतात की आपल्या देशाची व्यवस्था दोन मजली बिल्डींग वानी आहे.जिथे जिनाच नाही
वरच्या मजल्यातला माणुस कीतीही गाढव असला तरी त्याला खाली येण्याची सोय नाही आणि खालच्या घरातला माणुस कीतीही श्रेष्ट,विद्ववान असेना त्याला वरी जाण्याची सोय नाही.तो तिथेच जगेल व तिथेच मरेल.
पण बाबासाहेबानी ही रूढी पंरपरा मोडुन काढली.त्या घराला जिना बांधला जिथे खालचा माणुस त्याच्या कुवती नुसार वर जातो व वरचा खाली येतो.त्यानी जाती नुसार कामे मोडुन काढली.सार्याच समाजाला शिक्षणाची व्दारे मोकळी केली.जिथे पहले फक्त एक्याच समाजाला तो अधिकार होता आज कोणी काहीही बनता येत.त्यानी शिक्षणाचा मार्ग सार्याच जातीला मोकळा केला.
आज मी पाहतोय माझ्या समाजाला
त्याचा बॅन्ड बाजा तसाच ठेल्यात पडुन असतो.माझे आजोबा मांग बाज्या वाजवतात.एक मोत करून आले की कधीकधी लगेच दुसर फोन येत. लगेच जातात दोन दोन तीन तीन दीवस डोळ्याला झोप नसते.पण ते पैसे एक दोन दीवसात गायब.कारण येतातच कीती.वाजवणार्याच आगोदर चांगल चालत लग्न झाल की लेकरू तर बिमार पडतच तेव्हा रानोरान फिराव लागत.आज जास्तीत जास्त पोर शिक्षण आठवी नववीवर सोडतायत.आई बाप शिक म्हणतात पण कारट काय त्याच ऐकतच नाही.आता पोरग नग म्हणल्या वर बाप ज्यास्त म्हणतच नाही.कारण तोच शिकलेला नसतो.तो पोरगाच म्हणतो जेव्हा वय जात
असे भरपुर आहेत माझ्या समाजात.
आता गानेही जबरदस्त "मांगाची हालगी बोलती" म्हणजे आवड निर्मान करत आहेत
लेका तुच म्हणतोस मोठ्यान “माझ्या लग्नात मी डी.जे लावीन”.सारे असेच विचार करतायत देशातील मंडळी.डी जे लावतायत .ते डी जे तर आपले नाहीत.आणि मोठे मोठे बॅन्ड पार्ट्याही आपले नाहीत.
सारच बदलय भाऊ आता जाती नुसार कामे राहीले नाहीत.आता फक्त काम आहेत कोणी काहीही करू शकतो.आपलेच काम मनुन मिरवता कोनालाच येणार नाही.सिनेमात नट आणि नटीचे केस कापायला मेक अप करायला न्हावी नसतो आज.मोठे मोठे घरे बांधणारा,अपार्टमेंट बांधणारा गंवडी नसतो आज.मोठे मोठे चप्पलीचे दुकाने चांभाराचे नसतात.
आज जर कोनी माझ्या जातीच काम म्हणत असेल तर तो वेडा आहे.ह होत पहेल कोणीतरी प्रत्येक जातीला विशेष काम दील होत.तेच काम करा आणि भिक मागुन खा.दुसर करण्याची ईच्छाच करू नका.तसा अधिकारच नव्हता ना
आता कोणीही कोणाचे काम करतोय ना आम्हीही करू ना त्याच काम शिक्षण
दीलय ना आपल्याला आपल्या बापान हक्क
- मनोज कोंडीबाराव गायकवाड

Comments
Post a Comment