Posts

मातंग समाजाची झेंड्याविषयीची गफलत

हातभर लंगोट मिळत नव्हती.रंगाचा विचार करणं दुरचच होत. आज तोच समाज रंगाचा विचार करतोय, तेही झेंडाचा. ह्यावरून‌ समजत समाजाची प्रगती झालीय.सद्या मातंग समाजाचे कोनता झेंडा असावा म्हणुन सभे चालु आहेत,मिटींग चालु आहेत. कारण मातंगाचा एक रंगाचा झेंडा नाही.नांदेड,परभणी,बीड,हींगोली इकडे लाल झेंडा वापरतात तर पुणे, सोलापुरात भागात पिवळा आणि ह्या वेळेस लातुर ला भगवा सारखा दीसला. म्हणजे अख्या महाराष्ट्रात एक रंगाचा झेंडा नाही.आज मातंग समाज एक झेंडा असावा म्हणुन प्रयत्न करतोय. तर प्रश्र्न असा पडतो की, समाजाला आज पर्यंत झेंड्याची गरज पडली नाही का? मातंग समाजाचा झेंडा नव्हता का ? रंगाचा आणि झेंड्याचा विचार केला तर त्यांच्या इतिहास जुना आहे.राजे, महाराजे एखादा समुह हा विशीष्ठ रंगाचा वापर करायचे. युध्दप्रसंगी नसता जहाजावर झेंडे असायचे तो दुसरा प्रश्न....सांगण्याचा उद्देश इतकाच की झेंड्याचा इतिहास फारच जुना आहे. धर्मांचे झेंडे होते.पण देशातील‌ एका मोठ्या वर्गाला ,ज्याला चौथा वर्ग‌ मानलं गेलं होतं.धर्मान त्यांना शुद्र ठरवुन माणुस मनुन नाकारलं होतं.त्यात देशातल्या हजारो जाती होत्या. तो ब्राम्हणी धर...
                                           Date -11-Feb-2017 काल माझा वाढदीवस खुप खुप शुभेच्छा आल्या मित्र, मैत्रीनीने शुभेच्छा दील्या.कॉलेज मध्ये माझा वाढदीवस साजरा करण्यात आला.what's App आणि Facebook वरूनही भरपुर शुभेच्छा मिळाल्या,काहीजनानी भरपुर दीवसानंतर आठवन काढून फोन केले.भरपुर प्रेम मिळाले . खुप बरे वाटले, काहीच्या तर नविन ओळखी झाल्या .दीवस अखा आनंदीत गेला. बाबा कसे फेडु मी तुम्हचे उपकार तुम्ही नसता तर मला तारीखच नसती माहीती.आसा दीवसही आसतो कळलेही नसते.हा दीवस आला असता व गेलाही असता  रोजच्याच दीवसासारखा . मला कळले ही नसते,राहीलो असतो कुठेतरी मळकटलेल हाथ घेऊन.काळेकुठ्ठ चींधके आगांवर घेऊन तेही ठीगळाने भरलेले.गावाच्याबाहेर कुनाचतरी गार खंदत. नाहीतर हाताथ पिपानी घेऊन फिरलो आसतो गावोगावी.रोजच्याच सारखा हाही दीवस गेला आसता हा दीवस कुठेही नसता कोरला बाबा तुझ्या जन्मामुळे मिळाली आम्हाला जन्म तारीख आज आम्ही मोठ्या थाटामाटाने तो साजरा करतोय. माझ्या बापाचे जेव्हा त...

आस्तिक ते नास्तीक नंतर बुध्द...

आस्तिक ते नास्तीक नंतर बुध्द.... हा विषय घेन्यामाघलचा ऊद्देस म्हणजे काल रात्री माझ्याच विषयी विचार करत होतो. माझ्यात ईतक्या लवकर झालेल्या बदलाविषयी.आज जर मित्रांसोबत मंदीराकडे गेलो तर मधे जात नाही गेलोच तर हाथ जोडत नाही देवाविषयीची भावनाच मरून गेलीय.चार वर्षापुर्वी मी सर्वात जास्त दैववादी होतो. लहान असता पासुन मी पत्येक वेळेस प्राथना करत असायचो.मंदीर,मुर्ती आणि प्रतीमा ह्या दुर जरी असल्या तरी मी देवाला काहीना काही मागत,देवाच नाव जपत असायचो.माझ मन हे भितीने भरून गेलेले असायचे रोज रात्री झोपताना आणि दीवसभर आईवडीलांना काही होऊ नये म्हणुन प्राथना करीत होतो.मंदीराच्या समोरून जाताना हाथ जोडुन काहीना काही मागत पुटपुटत जायाचो.माझ्याकडुन काही चुक झालीच तर माफी मागत रहायचो.रोज रात्री देवाच नाव घेतल्याशिवाय झोपायचोच नाही. हे सर्व सांगायच म्हणजे सद्या माझ्या आजु बाजुला जे राहतात ते प्रश्नचिन्हात आहेत.ते नाना प्रकारचा विचार करत आहेत.माझा हे सांगण्याचा अजिबात उद्देश नाही की मी पन दैववादी होतो. आज मी कोनत्याच दैवीशक्ती,भुतबाधा,स्वर्ग नर्क अस्या कुठल्याच गोष्टीवर थोडासुध्दा विश्वास  नाही क...

संघटना

Image
भिमजयंतीची पहाट त्या दीवसी रोजच्या पेक्षा लवकरच ऊठलो होतो रात्री ऊशीरा झोपुनही.आंघोळ तेन झाली ह्या नागड्याला अंग झापायला कपडेही भेटले नसते पन काल बाबासाहेबामुळे नविन कपडे घेऊन आलो होतो अंगावर सारच नविन होत कारण १९५६ नंतर एकच सण ऊरलाय ते सणही काय कामाचे होते ज्या सणाच्या दीवसीही पुरणपोळी मिळायची नाही म्हणे.भिमजयंतीला एक चेहर्यावर अलगच खुशी असते.दोघेही भाऊ तयार झालो सकाळी ८:३० वाजताच.भावाची रूम MIT COLLEGE (औरंगाबाद) कडे , तिकडुन निघालो पुतळ्याकडे, जाताना वाटेत रेल्वे पट्री सर्व्याच शहरासारख पट्री च्या बाजुला भिमवाडा आसतो तसाच ईथेही.अर्धाशहराचे घान पाणी गटाराला मिळुन ते गटारे मोठ्या गटार्याला मिळुन नदीसारख सर्वी घान गल्लीच्या बाजुन धीम्मी गतीने धावत होते त्याचा वास येत होता पन त्यांच्या नाकाला सवय झाली होती.त्या गल्लीतुन जंयतीच्या आधल्या दीवसी  जाताना त्या गल्लीतली भिमजयंतीची ऊस्तुकता पाहुन एक कवीताच लिहीली होती.समोर गेल्यानंतर चौकात गंगाधर गाडेची शाळा होती तीथे कीत्येक युवा मंडळी थांबुन होती.तीथे थोड वेळ थांबुन बसस्टॉपला गेलो तीथे एस.टी कर्माचार्यानी भिमजयंतीच्या निमीत्त भाषनाच...

सावधान

Image
मांगानो सावधान धोक्याची घंटा तुम्हचा व्यवहार,तुम्हचे काम चोरी झालाय आणि चोरी होतोय. तुम्ही गावोगावी जाऊन वाजवुन खायायच काम चोरी होतोय.जे काम तुम्हच्या खिश्यात चार पैसे पाडत होत ते पळतय.तुम्हचच काय सार्याच जातीची कामे चोरी झालेत. चांभाराच चप्पल शिवन, कुभाराच मडके बनवन, गवड्याच घर बांधन,न्हाव्याच केस कापन सारच.आता कोनीही कोनतही काम करतय. जेव्हा पासुन या देशात बाबासाहेब जन्माला आले तेव्हा पासुन सारच बदलय.जाती नुसार काम बंद झालेत. तुम्हालाही माहीत आहे सद्या मोठ्या मोठ्या बॅन्ड पार्ट्या ह्या मोठ्या लोकांनच्या आहेत म्हणजे परजातीयाच्या ते एक्या कार्यक्रमात ८०ते ९०हजार कमवतात. आजच्या घडीचा विचार केला तर जास्तीत जास्त मांगाच्या घरी बॅन्ड बाजा आहे .खरतर सार्याच्याच घरी.आणि ज्याच्या घरी बॅन्ड नाही तिथला वाजवनारा असतोच.आपल्या छोट्या छोट्या पार्ट्या आहेत जे जास्तीत जास्त १५ ते २० हजार कमवतात.आता त्यातल प्रत्येकाला कीती येत तुम्हाला माहीतच आहे.कोनाला सुपारी भेटते तर कोनाला भेटत नाही.एक पार्टी २ नसता ३ लग्न वाजवते. आम्हच्या गल्लीत ईतकी ऊस्तुकता असते की सारे लहान मुल लोखंडी डबे,खोके,खपटे गळ्यात...

साठे जयंती

आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त..          [ अजुनही समजलाच नाही ] मी गावातुन रोज बसने कॉलेजला ये जा करायचो.गावापासुन देगलुर हे १८ की.मी  आहे.देगलुरला माझी आत्या असते म्हणुन मी रोज तीच्या घरी जायाचो. तीन वर्षापुर्वी १ ऑगष्ट २०१४ रोजी मी साठे जयंतीला  आत्याच्या घरी गेलो होतो.कारण गावातील जयंत्या काही दीवसानंतर असतात.मी गल्लीत गेलो जयंतीची तयार्या चालु होत्या.थोडावेळ थांबुन मी घराकडे निघालो.पलंगावर बसुन जेवन करत होतो.आत्या आगोदरच समोर बसुन होती.हा सगळा सणासारखा जल्लोष दरवर्षी पाहुन तीन एक मला प्रश्न विचारल   खरच तो प्रश्न विचारात पाडणारा होता. बाबासाहेब आणि आण्णाभाऊ साठे यांच्या घरात अडकवलेल्या फोटोना पाहत आत्या म्हनाली “मनोज हे जिवंत आहेत की मेलेत. आता हे कुठे राहतात” मी तर तिथे हासलोच आणि थोड्या वेळाने ऊत्तर दीलो “ते ईथे नाहीत ते मेलेत पण आपण हे जे चांगल जिवन जगतोय त्याच्याचमुळे.आता मी शिकत आहे ते बाबासाहेबा मुळे म्हणुन आपण त्यांची जयंती साजरी करतो” आत्यान विचारलेला प्रश्न ऐकुन माणुस हासतोच मीही हासलो पण तीच्यावर नाही.जे दहा पंधरा वर्षा...

Bhimnagar

-भिमनगरातुन- भिम नगरातुन जाताना पाहत निघालो छोट्यास्या जाणार्या वाटेच्या बाजुला मोठ्या दीमाखात ऊभारलेल्या छोट्यास्या घराना आशोक चक्र रंगवताना महापुरूषाचे प्रतिमा मायेने पुसताना थकलेल्या पायान,नव्वदी पार केलेल्या आजीन माझा भिम येतोय या ऊर्जेन साफ सफाई करताना पाहत निघालो लहान मुल खेळणे बाजुला ठेऊन पताके लावताना कामाला सुट्टी देऊन,युवा मंडळी जयंतीच नियोजन करताना तिन चाकी सायकलीवर बसुन माझा भिम येतोय गाणार्या पुरूषाला पाहत निघालो गरीबीत बुडालेल्या या गल्लीत भिमजयंतीच्या ओढीने हसताना सार्या जगाच सुख या गल्लीत नांदताना मंद गतीने पाऊले टाकत पाहत निघालो चालत चालत गल्लीच्या बाहेर निघालो दुसर्याच्या तोंडावर बारा  वाजलेले पाहीलो बाप विसरताना पाहीलो विचार केलो का बर ईतके ते लोक आंनदी माझ्याकडेच पाहीलो चार दीवसापुर्वी बापाकडे पैसे मागीतलो जोड करेन जयंतीपर्यत म्हणालेल्या बापाने जयंतीच्या आधल्यादीवसी पैसे पाठवले आणी मी जयंतीच्या ओढीने कपडे घेयाला निघालो मी माझ्या स्व:ताकडेच पाहीलो कारण भिमामुळे मी माणुस बनालो            - मनो...