Posts

Showing posts from 2017

सावधान

Image
मांगानो सावधान धोक्याची घंटा तुम्हचा व्यवहार,तुम्हचे काम चोरी झालाय आणि चोरी होतोय. तुम्ही गावोगावी जाऊन वाजवुन खायायच काम चोरी होतोय.जे काम तुम्हच्या खिश्यात चार पैसे पाडत होत ते पळतय.तुम्हचच काय सार्याच जातीची कामे चोरी झालेत. चांभाराच चप्पल शिवन, कुभाराच मडके बनवन, गवड्याच घर बांधन,न्हाव्याच केस कापन सारच.आता कोनीही कोनतही काम करतय. जेव्हा पासुन या देशात बाबासाहेब जन्माला आले तेव्हा पासुन सारच बदलय.जाती नुसार काम बंद झालेत. तुम्हालाही माहीत आहे सद्या मोठ्या मोठ्या बॅन्ड पार्ट्या ह्या मोठ्या लोकांनच्या आहेत म्हणजे परजातीयाच्या ते एक्या कार्यक्रमात ८०ते ९०हजार कमवतात. आजच्या घडीचा विचार केला तर जास्तीत जास्त मांगाच्या घरी बॅन्ड बाजा आहे .खरतर सार्याच्याच घरी.आणि ज्याच्या घरी बॅन्ड नाही तिथला वाजवनारा असतोच.आपल्या छोट्या छोट्या पार्ट्या आहेत जे जास्तीत जास्त १५ ते २० हजार कमवतात.आता त्यातल प्रत्येकाला कीती येत तुम्हाला माहीतच आहे.कोनाला सुपारी भेटते तर कोनाला भेटत नाही.एक पार्टी २ नसता ३ लग्न वाजवते. आम्हच्या गल्लीत ईतकी ऊस्तुकता असते की सारे लहान मुल लोखंडी डबे,खोके,खपटे गळ्यात...

साठे जयंती

आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त..          [ अजुनही समजलाच नाही ] मी गावातुन रोज बसने कॉलेजला ये जा करायचो.गावापासुन देगलुर हे १८ की.मी  आहे.देगलुरला माझी आत्या असते म्हणुन मी रोज तीच्या घरी जायाचो. तीन वर्षापुर्वी १ ऑगष्ट २०१४ रोजी मी साठे जयंतीला  आत्याच्या घरी गेलो होतो.कारण गावातील जयंत्या काही दीवसानंतर असतात.मी गल्लीत गेलो जयंतीची तयार्या चालु होत्या.थोडावेळ थांबुन मी घराकडे निघालो.पलंगावर बसुन जेवन करत होतो.आत्या आगोदरच समोर बसुन होती.हा सगळा सणासारखा जल्लोष दरवर्षी पाहुन तीन एक मला प्रश्न विचारल   खरच तो प्रश्न विचारात पाडणारा होता. बाबासाहेब आणि आण्णाभाऊ साठे यांच्या घरात अडकवलेल्या फोटोना पाहत आत्या म्हनाली “मनोज हे जिवंत आहेत की मेलेत. आता हे कुठे राहतात” मी तर तिथे हासलोच आणि थोड्या वेळाने ऊत्तर दीलो “ते ईथे नाहीत ते मेलेत पण आपण हे जे चांगल जिवन जगतोय त्याच्याचमुळे.आता मी शिकत आहे ते बाबासाहेबा मुळे म्हणुन आपण त्यांची जयंती साजरी करतो” आत्यान विचारलेला प्रश्न ऐकुन माणुस हासतोच मीही हासलो पण तीच्यावर नाही.जे दहा पंधरा वर्षा...

Bhimnagar

-भिमनगरातुन- भिम नगरातुन जाताना पाहत निघालो छोट्यास्या जाणार्या वाटेच्या बाजुला मोठ्या दीमाखात ऊभारलेल्या छोट्यास्या घराना आशोक चक्र रंगवताना महापुरूषाचे प्रतिमा मायेने पुसताना थकलेल्या पायान,नव्वदी पार केलेल्या आजीन माझा भिम येतोय या ऊर्जेन साफ सफाई करताना पाहत निघालो लहान मुल खेळणे बाजुला ठेऊन पताके लावताना कामाला सुट्टी देऊन,युवा मंडळी जयंतीच नियोजन करताना तिन चाकी सायकलीवर बसुन माझा भिम येतोय गाणार्या पुरूषाला पाहत निघालो गरीबीत बुडालेल्या या गल्लीत भिमजयंतीच्या ओढीने हसताना सार्या जगाच सुख या गल्लीत नांदताना मंद गतीने पाऊले टाकत पाहत निघालो चालत चालत गल्लीच्या बाहेर निघालो दुसर्याच्या तोंडावर बारा  वाजलेले पाहीलो बाप विसरताना पाहीलो विचार केलो का बर ईतके ते लोक आंनदी माझ्याकडेच पाहीलो चार दीवसापुर्वी बापाकडे पैसे मागीतलो जोड करेन जयंतीपर्यत म्हणालेल्या बापाने जयंतीच्या आधल्यादीवसी पैसे पाठवले आणी मी जयंतीच्या ओढीने कपडे घेयाला निघालो मी माझ्या स्व:ताकडेच पाहीलो कारण भिमामुळे मी माणुस बनालो            - मनो...

Shital Sathe

Image
हातात डफ घेऊन मुखी भिमाच गान गाते मुदड्याना जागे तु करते थाप तुझी डफावरती आन्याय गुलामीवर मात शोषिताचा न्याय मागतो तुझा तो आवाज सत्य तु सांगतेस आसत्याने भरलेल्या आंधारल्या गल्लीत भिमसुर्याचा प्रकाश पोहचवतेस प्रतेक घराघरात हक्कासाठी बंड करण्यास लाखो भावाना पेटवत भिमशिखराची वाट दाखवतेस हातात डफ घेऊन मुखी भिमाच गान गाते - मनोज कोंडीबाराव गायकवाड क्रांतीकारी जय भिम .......ताई

Dhasal

बोलत होती लेखनी सळसळवीत होती रक्त हक्कासाठी मैदनात उतरवीत होती मानस शब्दातच भरला होता आगेचा निखारा जागी करत होती, भीम सागर हा सगळा भरला लाटेनी किनारा,शब्दानी उसळी शब्दा शब्दा ने बनली कवीता झोपलेल्या मानसाला उठवी बोलत होती लेखनी सळसळवीत होती रक्त गुलामी होती संपवत आन्यायाविरोद्धात होती लढत मानुसकीची लढाई लढत होती मानस आजही लढा चालू ,लढत आहेत मानस                             - गायकवाड मनोज कोंडीबाराव

जिजा

Image
जिजा,      पोतराजाचा पोरगा तु तुला बाबासाहेब कळला म्हणुनच तु मानवी हक्कासाठी लढला बाप तुझा गरीबीची पुजा करत गेला आंगावरती चिद्या,पायात घुगरू बाधून निच प्रथा पुढे नेत गेला पोटासाठी लाचार पोतराच जगन भिक मागुन नाही घरात दान झोली भरायला दारोदार फिरन जिजा,      पोतराजाचा पोरगा तु तुला बाबासाहेब कळला म्हणुनच तु मानवी हक्कासाठी लढला डोक्यावरती देवीच वड वाढल होत तीनच समाजाला गुलामीत ठेवल होत तुला भिमसुर्य कळला आंधारतल्या वाटेवरती ऊजेड दीसला तुझ्या पोतराज बापाची ऊर्जा आली कामा मागीन मी चार घर जास्त महाराच्या पोरासारख शिक येथुन तुझा भिमसंघर्ष सुरु झाला शिक्षणास तुझ्या प्रारभ झाला आन्याय,आत्याचार,गुलामी च्या विरोधात मनुवाद्यान्या फाडण्यासाठी पॅथर उभी झाली त्यात तुही गर्जरास नामांतरात भाग तु घेतलास आस्मिमेतेचा लढा तु लढलास भिमसैनीकाच कार्य तु केलास गुलामी,आन्यायाचे ओझे डोकी घेऊन वाहण्यार्याचे झाडे तु कापलास बापासहीत दुसर्यानाही मुक्त केलास सामाजिक स्वातंत्र्यासाठी,गावकुशीचे काम सोडवण्यासाठी,आर्थिकदुस्थ्या संपन्नतेसाठी आभिमानाच्या घास...

भिमा तुझ्यामुळे

काल माझा वाढदीवस खुप खुप शुभेच्छा आल्या मित्र, मैत्रीनीने शुभेच्छा दील्या.कॉलेज मध्ये माझा वाढदीवस साजरा करण्यात आला.what's up आणि Facebook वरूनही भरपुर शुभेच्छा मिळाल्या,काहीजनानी भरपुर दीवसानंतर आठवन काढून फोन केले.भरपुर प्रेम मिळाले . खुप बरे वाटले. काहीच्या तर नविन ओळखी झाल्या .दीवस आखा आनंदीत गेला. बाबा कसे फेडु मी तुम्हचे उपकार तुम्ही नसतात तर मला तारीखच नसती माहीती.आसा दीवसही आसतो कळलेही नसते.हा दीवस आला आसता व गेलाही आसता  रोजच्याच दीवसासारखा . मला कळले ही नसते.राहीलो आसतो कुठेतरी मळकटलेल हाथ घेऊन.काळेकुठ्ठ चींधके आगांवर घेऊन तेही ठीगळाने भरलेले.गावाच्याबाहेर कुनाचतरी गार खंदत.नाहीतर हाताथ पिपानी घेऊन फिरलो आसतो गावोगावी.रोजच्याच सारखा हाही दीवस गेला आसता .हा दीवस कुठेही नसता कोरला बाबा तुझ्या जन्मामुळे मिळाली आम्हाला जन्म तारीख आज आम्ही मोठ्या थाटामाटाने तो साजराकरतोय. माझ्या बापाचे जेव्हा तुझ्यामुळे नाव पडले शाळेत खोटीच तारीख पण तारीख मिळाली.मंग माझ्या शिकलेल्या बापाने माझ्या जन्माच्या दीवशी ज्या हाताथ आगोदर फावड ,कुर्हाड घेऊन घट्टे पडायचे त्याच हातात तु पेन दीली...

रान उनाड

Image
सारीकडे आसच उनाड रान गरीबीची भागत नाही ईथे तहान भाकरीच्या घासासाठी गाळाव लागत घाम सारीकडे आसच उनाड रान माझ्या समाजाची शेती डोगरा डोगरान तरीही शासन म्हणतय करून खावा जोमान त्याला नाही ह्याची जान ईथे रोजचच रीहीलय एका दोघाच  मरन भोग हे जातीच घेऊन जगतोय माझा बाप आस्यात कमवुन खातोय आम्ही घास तरीही घडतय रोज जातीवादी आम्हच्या झोपड्या जाळन सारीकडे आसच उनाड रान मी करेन माझ्या समाजाला समान कुनावर करू मी प्रेम माय जाते माझी, हातात खुरप घेऊन दुसर्याच्या शेतान आस्यात जगताना कुनावर करू मी प्रेम समाज दळल जातय जातीवाद्याच्या गिरनीत फेकल जात गावच्या वेशीत आब्रुची रांगोळी केली जाते धुर्यावर गाठुन आहे माझच नात लागतो मी समाजच देन घेतो शपथ मनुवाद्याना ठेचिन करतो मी माझ्या समाजावर प्रेम माझ्या समाजावर प्रेम       - मनोज कोंडीबाराव गायकवाड Happy Valentine day

सावित्रीमाई

आज  सावित्रीबाई फुले  यांची जयंती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मामुळे 3 जानेवारी या तारखेला नवी ओळख मिळीली.फक्त तारखेला नसून या देशातल्या प्रत्येक स्त्रीला  ओळख मिळीली तीला आस्तित्व निर्मान करण्याची संधी या स्पर्धेच्या युगात पुरूषासोबोत लढण्याचे बळ देण्याला महान स्त्रीचा आज जन्म दीवस.आपल्या भारत देशात महीलाना शिकन्याचा आधिकारच नव्हता.सतत पाच हजार वर्ष स्त्रीयाना वंचित ठेवण्यात आले.त्यासाठी कोणत्या महापुरूषाने या कोनत्या देवाने त्याच्यासाठी आवाज सूद्धा ऊठवला नाही.प्रतेक धर्माने स्त्रीयाना दुय्यम स्थान दीले ती चार भितींच्याआत जन्मावे जगावे व मरावे पण स्वातंत्र पणे जगण्याचे हक्क नव्हते.बा ज्योतीबाच्या साथीने प्रत्येक लढ्यात ज्योतीबा फुलेना साथ देऊन.या देशातील रूढी परपंरा नष्ट करून हजारो वर्षाचा ईतिहास बदलून ईतिहास घडविला.स्त्रीयांच्या उन्नती साठी शिक्षणच महत्वाचे शस्त्र आहे ओळखून पुण्याच्या बुधवार पेठेत मुलीसाठी  व समाजातील शोषित घटकासाठी शाळा सुरू करून क्रांती घडवली.तेथूनच सुरू झालेल्या सर्षामुळे आज मुली मुलाच्या बरोबरीने शिक्षण घेऊन प्रत्यक क्षेत्रात भरारी घेतेय.सावित...

मुक्ताई

मुक्ता साळवे यांच्या मांग महाराच्या दु:खाविषयी निबंद याच्यातुन घेतलेला हा लेख आहे वयाच्या चौदाव्या वर्षी सन १८५५ साली.ईथल्या रूढीपरंपरने,आनिष्ट धर्मरूढीने दीलेले मांगा महाराला दु:ख तिने हातात लेखीन घेऊन मांडले.आणि आज सूद्धा तो मुक्ताई चा निबंध आज सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतायत????? आता जर वेद आधारेकरुन आमचा व्देष करणारे लोक यांच्या मताचे खंडण करावे तर आम्हापेक्षा उंच विशेषकरून लाडुखाऊ ब्राम्हण लोक आसे म्हणतात,की वेद तप आमचीच मत्ता आहे.आम्हीच याचे आवलकन करावे.तर यावरून ऊघड दिसते,की आम्हास धर्मपुस्तक नाही.जर वेद ब्राम्हणासाठी आहेत,तर वेदाप्रमाणे वर्तणुक करणे हा ब्राम्हणा धर्म होय.जर आम्हाला धर्मसंबधी पुस्तके पाहण्याची मोकळीक नाही,तर आम्ही धर्मरहीत आहोत आसे साफ दीसते की नाही बरे! हर हर ,आसे जे वेद,की ज्याचे आवलोकन केल्याने महापातक घडते,तर मग त्याच्या आधारें आचरण केल्याने आम्हाकडेस कीती मुर्खत्व येईल बरे? व ईग्रज लोक बैबलाच्या आधारेंकरुन आणि ब्राम्हणलोक वेदाधारेकरुन चालतात,म्हणुनच ते आपल्याला खर्याखोट्या धर्माप्रमाने जास्तकमी आम्हपेक्षा सुखी आहेत आसे वाटते. तर हे भगवान,तुजकडून आलेला...
जिवन माझ्या भिमाच