मातंग समाजाची झेंड्याविषयीची गफलत

हातभर लंगोट मिळत नव्हती.रंगाचा विचार करणं दुरचच होत. आज तोच समाज रंगाचा विचार करतोय, तेही झेंडाचा. ह्यावरून‌ समजत समाजाची प्रगती झालीय.सद्या मातंग समाजाचे कोनता झेंडा असावा म्हणुन सभे चालु आहेत,मिटींग चालु आहेत.
कारण मातंगाचा एक रंगाचा झेंडा नाही.नांदेड,परभणी,बीड,हींगोली इकडे लाल झेंडा वापरतात तर पुणे, सोलापुरात भागात पिवळा आणि ह्या वेळेस लातुर ला भगवा सारखा दीसला.
म्हणजे अख्या महाराष्ट्रात एक रंगाचा झेंडा नाही.आज मातंग समाज एक झेंडा असावा म्हणुन प्रयत्न करतोय.
तर प्रश्र्न असा पडतो की, समाजाला आज पर्यंत झेंड्याची गरज पडली नाही का?
मातंग समाजाचा झेंडा नव्हता का ?

रंगाचा आणि झेंड्याचा विचार केला तर त्यांच्या इतिहास जुना आहे.राजे, महाराजे एखादा समुह हा विशीष्ठ रंगाचा वापर करायचे. युध्दप्रसंगी नसता जहाजावर झेंडे असायचे तो दुसरा प्रश्न....सांगण्याचा उद्देश इतकाच की झेंड्याचा इतिहास फारच जुना आहे.
धर्मांचे झेंडे होते.पण देशातील‌ एका मोठ्या वर्गाला ,ज्याला चौथा वर्ग‌ मानलं गेलं होतं.धर्मान त्यांना शुद्र ठरवुन माणुस मनुन नाकारलं होतं.त्यात देशातल्या हजारो जाती होत्या.

तो ब्राम्हणी धर्माचा झेंडा,आपले उघडे अंग झाकु शकले नाही.आपले करपलेले अंग झाकु शकले नाही,आपल्यासाठी पाणी झाले नाही.आपल्या झोपडीवरील छप्पर झाल नाही.आपले मानवी हक्क अधिकार देऊ शकले नाही. तो कसं काय देईल त्यांनच सर्व काढुन घेतलं होतं. आपण धर्म नसलेले माणसे होतो.

देशातल्या कोनत्याच शोषित जातीला त्याची ओळख नव्हती तसंच मातंग समाजाचीही ओळख नव्हती.
ईथल्या शोषित,दुर्बल जातीला झेंडा भेटला का ?
भेटला...
डॉ बाबासाहेब आंबेडकरानी त्यांना मानवी स्वातंत्र बहाल करण्यासाठी निळा झेंडा घेऊन क्रांती केली.त्यांनी स्वंतत्र कामगार पक्ष आणि शेडुल्ड कास्ट फेडरेशनचा निळा झेंडा घेऊन लढा देऊन देशातल्या प्रत्येक गुलामाला संविधान लिहून मुक्त केले.
तोच पहीला निळा झेंडा होता ईथल्या शोषित समाजाचा.जो जिंकलाही होता.

बाबासाहेबाच्यानंतरही मातंग समाज हा त्यांच्या हक्कांसाठी, अन्यायाविरुद्धात निळाच घेऊन रस्त्यावर उतरत होता. विचारपुस केली असता, आता आता पर्यंत म्हणजे जास्तीत जास्त  १९९६ पकडता येईल तेथुन वेगळ्या झेड्यासाठी सुरूवात झाली असेल.
ते पण म्हणता येणार नाही नंतरच्या काळात ही निळाच घेऊन तो रस्त्यावर उतरला.
इतक्या वर्षांनंतर मातंग समाजाला वेगळ्या झेंड्याची गरज का भासतेय हा चर्चेचा विषय आहे.
निळ्या झेंड्याचा विचार केला तर भारतातल्या दलितांचा झेंडा म्हणुन सार्या जगात ओळख आहे.आजही भारतातील गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राज्यस्थान,कर्नाटक,आंद्रप्रदेश,बिहार,दील्ली
देशातील सर्व दलित वर्ग त्यांच्या हक्कांसाठी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात निळाच घेऊन रस्त्यावर उतरतो.
आताच्याच २ एप्रिलला पाहीलच असेल.....
आपल्या समाजाने समाजाचा वेगळा झेंडा निर्माण केला. आता तो एक रंग करण्याकडे वळतोय
जो की जिल्हा नुसार वेगळा आहे.कुठे लाल, कुठे पिवळा, कुठे मिक्स
लाल हा रंगाचा झेंडा म्हणलं की कम्युनिस्ट पार्टीचा म्हणुन प्रचलित आहे. अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट पक्षाचे होते म्हणून समाजांनी तो निवडला.तसेच त्यांची लाल बावटा पथक, आणि तसेच त्यांच्या काव्यात लाल झेंडा वीषयीचा उल्लेख आढळतो.
 पण भारत देशाचा विचार करता जातीव्यवस्था ही मुख्य समस्या आहे.आर्थिक नाही
जातीव्यवस्था मुळेच सर्व समाजाची बिकट परिस्थिती होती.एकावेळच्या जेवणासाठी रानोमाळ फिरावं लागायचं.ईथल्या व्यवस्थेने लादलेल्या निच नियमांमुळे पाणीही आपलं नव्हत.
आजही जर आपल्याला घरासाठी जागा घेयाचे असेल आणि तिथे उच्चवर्णीय मानले गेलेले राहत असतील तर जागा देत नाहीत कारण पुढे चालुण आजुबाजुची जागा विकताना अडचण येईल म्हणुन नकार दीला जातो
आपल्याजवळ कीतीही पैसा असु दे.तसच रूम पाहताना ही नाकारली जाते, तिथे तर पैसाचा प्राब्लेम नसतो.
ते जाऊ द्या आताच काही दीवसापुर्वी घडलेला देशातले प्रकरण देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना ब्रम्हा आणि जगनाथपुरीच्या मंदीरात येऊ दील नाही.
ते कोणत्या बेसिस वर जातीच्या का आर्थिक ???
तुम्हाला आजही खेड्यात जातीवरून बोललं जातं का गरीबांच्या म्हणुन बोललं जात....

पण पिवळ्या रंग का...माहीत नाही पण पिवळा रंग म्हणलं की  देव आठवतात ते खंडोबा वैगेरे आणि तेही तेंच करतायत पुन्हा तिकडेच नेतायत.ज्या देवाला समाजाच दु:खू समजलं नाही.हजारो वर्ष शुद्र म्हणुन सडवल, आजुबाजुला फडकुन दील नाही.काल पाण्यासाठी तडफवल त्यां देवाच अस्तित्व नाकारताना दीसत नाहीत.
रूद्रवाडीच्या प्रकरणात तेच दीसल पिवळ्याचे समर्थक रुद्रवाडीच्या मंदीरात घंटा वाजवताना दीसले.हजारो वर्षांपासून जवळ येऊ दील नाही.आताही ते मध्येच जाण्यासाठी लढत होते आणि मंदिरातल्याला पुर्वज म्हणुन स्व:ताच दगड झाले होते

आपला समाज निळाच घेऊन अन्यायाला वाचा फोडु शकतो कारण त्यांनेच आपली सामाजीक राजनैतीक, आर्थिक परिस्थिती बदलवली.
आरक्षण्याचा लढा लढवुन आरक्षण मिळवून दील....आजचे माणुसपण बहाल केलय....
निळा झेंडा हा एकाच समाजाची मालकी नाही.तो माणुसकीच्या लढ्याच प्रतिक आहे.

-मनोज कोंडीबाराव गायकवाड

Comments

Popular posts from this blog

रान उनाड

सावधान