Date -11-Feb-2017 काल माझा वाढदीवस खुप खुप शुभेच्छा आल्या मित्र, मैत्रीनीने शुभेच्छा दील्या.कॉलेज मध्ये माझा वाढदीवस साजरा करण्यात आला.what's App आणि Facebook वरूनही भरपुर शुभेच्छा मिळाल्या,काहीजनानी भरपुर दीवसानंतर आठवन काढून फोन केले.भरपुर प्रेम मिळाले . खुप बरे वाटले, काहीच्या तर नविन ओळखी झाल्या .दीवस अखा आनंदीत गेला. बाबा कसे फेडु मी तुम्हचे उपकार तुम्ही नसता तर मला तारीखच नसती माहीती.आसा दीवसही आसतो कळलेही नसते.हा दीवस आला असता व गेलाही असता रोजच्याच दीवसासारखा . मला कळले ही नसते,राहीलो असतो कुठेतरी मळकटलेल हाथ घेऊन.काळेकुठ्ठ चींधके आगांवर घेऊन तेही ठीगळाने भरलेले.गावाच्याबाहेर कुनाचतरी गार खंदत. नाहीतर हाताथ पिपानी घेऊन फिरलो आसतो गावोगावी.रोजच्याच सारखा हाही दीवस गेला आसता हा दीवस कुठेही नसता कोरला बाबा तुझ्या जन्मामुळे मिळाली आम्हाला जन्म तारीख आज आम्ही मोठ्या थाटामाटाने तो साजरा करतोय. माझ्या बापाचे जेव्हा त...
Posts
Showing posts from February, 2018
आस्तिक ते नास्तीक नंतर बुध्द...
- Get link
- X
- Other Apps
आस्तिक ते नास्तीक नंतर बुध्द.... हा विषय घेन्यामाघलचा ऊद्देस म्हणजे काल रात्री माझ्याच विषयी विचार करत होतो. माझ्यात ईतक्या लवकर झालेल्या बदलाविषयी.आज जर मित्रांसोबत मंदीराकडे गेलो तर मधे जात नाही गेलोच तर हाथ जोडत नाही देवाविषयीची भावनाच मरून गेलीय.चार वर्षापुर्वी मी सर्वात जास्त दैववादी होतो. लहान असता पासुन मी पत्येक वेळेस प्राथना करत असायचो.मंदीर,मुर्ती आणि प्रतीमा ह्या दुर जरी असल्या तरी मी देवाला काहीना काही मागत,देवाच नाव जपत असायचो.माझ मन हे भितीने भरून गेलेले असायचे रोज रात्री झोपताना आणि दीवसभर आईवडीलांना काही होऊ नये म्हणुन प्राथना करीत होतो.मंदीराच्या समोरून जाताना हाथ जोडुन काहीना काही मागत पुटपुटत जायाचो.माझ्याकडुन काही चुक झालीच तर माफी मागत रहायचो.रोज रात्री देवाच नाव घेतल्याशिवाय झोपायचोच नाही. हे सर्व सांगायच म्हणजे सद्या माझ्या आजु बाजुला जे राहतात ते प्रश्नचिन्हात आहेत.ते नाना प्रकारचा विचार करत आहेत.माझा हे सांगण्याचा अजिबात उद्देश नाही की मी पन दैववादी होतो. आज मी कोनत्याच दैवीशक्ती,भुतबाधा,स्वर्ग नर्क अस्या कुठल्याच गोष्टीवर थोडासुध्दा विश्वास नाही क...