आस्तिक ते नास्तीक नंतर बुध्द...

आस्तिक ते नास्तीक नंतर बुध्द....

हा विषय घेन्यामाघलचा ऊद्देस म्हणजे काल रात्री माझ्याच विषयी विचार करत होतो. माझ्यात ईतक्या लवकर झालेल्या बदलाविषयी.आज जर मित्रांसोबत मंदीराकडे गेलो तर मधे जात नाही गेलोच तर हाथ जोडत नाही देवाविषयीची भावनाच मरून गेलीय.चार वर्षापुर्वी मी सर्वात जास्त दैववादी होतो. लहान असता पासुन मी पत्येक वेळेस प्राथना करत असायचो.मंदीर,मुर्ती आणि प्रतीमा ह्या दुर जरी असल्या तरी मी देवाला काहीना काही मागत,देवाच नाव जपत असायचो.माझ मन हे भितीने भरून गेलेले असायचे
रोज रात्री झोपताना आणि दीवसभर आईवडीलांना काही होऊ नये म्हणुन प्राथना करीत होतो.मंदीराच्या समोरून जाताना हाथ जोडुन काहीना काही मागत पुटपुटत जायाचो.माझ्याकडुन काही चुक झालीच तर माफी मागत रहायचो.रोज रात्री देवाच नाव घेतल्याशिवाय झोपायचोच नाही.
हे सर्व सांगायच म्हणजे सद्या माझ्या आजु बाजुला जे राहतात ते प्रश्नचिन्हात आहेत.ते नाना प्रकारचा विचार करत आहेत.माझा हे सांगण्याचा अजिबात उद्देश नाही की मी पन दैववादी होतो.
आज मी कोनत्याच दैवीशक्ती,भुतबाधा,स्वर्ग नर्क अस्या कुठल्याच गोष्टीवर थोडासुध्दा विश्वास  नाही

कोनताही बदल हा झटकी पट होत नाही. टप्या टप्याने होतो. मुख्य म्हणजे माझ्या बदला माघे कारण,माझे घर आहे. माझे वडील हे उच्चशिक्षित,
त्यांनी माझ्या जिवनातल सर्वात महत्वाच काम केल त्यांनी मला त्यांचा बाप जो माझा सुध्दा बाप आहे. बाबासाहेब सांगीतला मी जेव्हा पहील्या वर्गात होतो तेव्हा पासुनच मला बाबासाहेब,शिवाजी फुले शाहू अण्णा भाऊ समजत गेले.
मी बाबासाहेबांचा फारच कमी म्हणजे लईच कमी काळ तिरस्कार केला.तेही जातीमुळे   आपल्या जातीचा नेता दुसर्या जातीचा नेता म्हणुन...मी बाबासाहेबाना आपलस मांनल होत पन विचार अजुन समजले नव्हते.वैचारीक लढा खेड्यापाड्या पर्यत कमीच पोहचला आहे.वडीलही दैववादी होते कीतेक प्रथा नाकारायचे पण थोडा अंश अजुनही होता.भितीपोटी  असेल अस केल तर तस होईल.प्रत्येकाला भिती असतेच आपन अस केल तर देव आपल्या घरच्याला, आपल्याला काहीतरी करेल असी एक भिती असते
माझ्या सोबतीला आंबेडकर ही होता आणि देवही होता  ही स्टेज सर्वात घातक होती.दोन विरूध्द दीश्या घेऊन जगत होतो.ना मेलो असतो ना जगलो असतो
मध्येच घुटमळत राहीलो असतो.जास्त काळ ह्या स्टेजला राहीलो नाही कारण सार्या जगाला माहीती आहे आंबेडकरी विचारात काय ताकद आहे

मंग मी विचार करू लागलो देवाने थोडी सांगीतल की असच करा   तसच करा   हे तर माणसानीच तयार केलय.हे बरोबर होत पण मी देवाच अस्तित्व माणुन दुसर्याला दोष देयाचो.घरी आजी जर “नारळ फोडुन ये"असे बोलली तर “घरात फोटो आहे ना तिथे फोड,तच्यात पन देव असेलच ना”

मंग कालांतराने डोक अजुन विचार करायला लागल
आपन अगोदर कसे होतो.आपल्या बापाची,आजी आजोबाचे कसे दीवस होते .त्यांच्यावर कीत्येक वर्षापासुन अन्याय होत होता. तेव्हा कुठे होता देव?
आज सुध्दा मंदीरात काही समाज मध्ये जातो आणि बाकीचा समाज दुरून दर्शन घेतो त्याना मध्ये परवानगी नसते,जर देवाने सर्वाना बनवले असेल तर याच्यावर हे अन्याय का...त्याला दीसत नसेल का
कीतेक वर्ष माझा समाज पाण्यावाचुन मेला त्याला ते दु:ख दीसले नाहीत का?
गावकुशीच्या बाहेर ठेवल होत ते दीसल नाही का ?
महीलांना,अस्प्रुस्याना शिक्षनाचा अधिकार नव्हता तेव्हा देवाला काही करता आल नाही का?
असे कीत्येक प्रश्न डोक्यात घोळत असायचे.
आजच जे काही वैभव आहे हे सर्व बाबासाहेबामुळे आहे याचीही जान होत गेली.माझ्या मोठ्या भावाने माझ्याही अगोदर देव शक्ती भुत नाकारले होते.मी ईकडे ना तिकडे होतो.मी मधोमध होतो.आम्हा दोघा भावांचे बोलने चालुच असायचे कोनत्या ना कोनत्या विषयांवर.आजही चालुच असत.
मी निरक्षन करत गेलो विचार करत गेलो.ज्या भितीपोठी मी देवावर विश्वास ठेवायचो तो मोडकळायला येत होता.मरन सर्वानाच अठळ आहे.देव माननाराही मरतो आणि देव न माननाराही मरतो.असे नसते की हा लवकर मरतो,हा ऊशीरा मरतो.देव माननाराही बिमार पडतो,त्यालाही रोग घेरतो. त्याचाही अपघात होतो आणि ह्याचाही अपघात होतो. मी त्याला कस काय मानु ज्याच अजुन कोनी अस्तित्व सिध्द केल नाही...ज्याच अस्तित्वच नाही.
विज्ञानान हे सिध्द केल की ही स्रुष्टी कसी निर्मान झाली.
विज्ञानानच हे सर्व जग बदलल,आजच जे सार तंत्रज्ञान विकसीत झाल ते विज्ञानामुळ् कोनत्या दैवीशक्ती मुळ नाही हे समजत गेल .आणि हळु हळु माझ पुर्णच देव मांनन बंद होत गेल.

माघच्या वर्षी मावसीच्या मुलीच लग्न होत.गेलो होतो.आळंक्या निघाले सर्वे देवाच दर्शन घेयाला गेले तिकडुन अजुन एक नवरी आली ती ऊच्चजातीची ती डायरेक्ट मध्ये गेली आणि माझी बहीन आणि हे सर्व बाहेरून दर्शन घेत होते.मी फक्त पाहत राहीलो.मंग नवरी संध्याकाळी नवरदेवाच्या घरी जायाला निघाली.जाता जाता दर्शन घेयाला पुन्हा गेली.तेव्हा मंदीराचा पुजारी पावती बुक घेऊन पाऊती फाडायला आला.
माझ्या भावान विचारल “हे कस्यासाठी पैसे मागत आहात”  तेव्हा पुजारी बोलला  “मंदीराच्या बांधकामासाठी”
“हे बाहेरून येऊन बाहेरूनच जातात त्यांना मंदीर कस का असेना त्याच काय काम...ईथे असी एकच जागा आहे जिथे या समाजानी  पायही ठेवला नाही.मंग तिथल्या बांधकामासाठी यांचे पैसे कस काय चालतील. ते ईथुनच निघुन जातात त्या देवाला  थोडीही कसी कीव येत नसेल”...अस भाऊ बोलत होता
 ते अस कस चालत देवावच लागेल प्रथा आहे
आणि मंदीरातुन दोघा तीघानी आवाज काढला.ते खाण्या पिण्याच असते अस बोलत होते.मी लगेच त्याना विचारल “का तुम्हाच्यापैकी कोनी मास खात नाही का ?" ते चौघ पाचजनही गुपचुप. मी विचारल आम्हचा माळकरी असला तर त्याला मध्ये येऊन देता का?
असे कीत्येक प्रश्नाचे ऊत्तर ते देऊच शकले नाहीत.ते  पैसे न मागता निघुन गेले.जे हे बाहेरून पाया पडुन निघुन जात होते त्यानीही विचार केला असता “आपनालाच अस का ? त्याना असे प्रश्न पडनारच नाहीत कारन ते दैववादी आहेत.त्यांच्यापासी ऊत्तर असत  माघच्या जन्मातले पाप.त्यांची विचारशक्ती तीथेच मरन पावते.
मी बाबासाहेबांना मानतो म्हणुन मी त्यांची कधीच पुजा करनार नाही.गौतम बुध्दांचीही मी पुजा नाकरतो.मी फक्त विचार जोपासत जाईल आणि विचारातुन मानवासाठी क्रांती घडवत जाईल

मला नास्तीकतेच्याच पायरीवर राहणे योग्य वाटत नाही.हे तर अस झाल.चिकलात राहुन आपल्यापुरतच चिकल बाजुला करायच.बाजुलाही सांगन्याच प्रयत्न करायच.मी कसावररून ग्रहीत धरू की चिकलधारी पुन्हा माझी जागा चिकलानी भरनार नाहीत .ते जर ऊद्या मोहीम चालवले तर माझी पिढी त्यात अडकनार नाही हे कस्याहुन
आणि माझ्या बापासारख कोनी त्यांना भिमरावही सांगनार नाही ज्यामुळे ते बंड करतील...

- मनोज कोंडीबाराव गायकवाड

Comments

Popular posts from this blog

रान उनाड

सावधान

मातंग समाजाची झेंड्याविषयीची गफलत