संघटना


भिमजयंतीची पहाट त्या दीवसी रोजच्या पेक्षा लवकरच ऊठलो होतो रात्री ऊशीरा झोपुनही.आंघोळ तेन झाली ह्या नागड्याला अंग झापायला कपडेही भेटले नसते पन काल बाबासाहेबामुळे नविन कपडे घेऊन आलो होतो अंगावर सारच नविन होत कारण १९५६ नंतर एकच सण ऊरलाय
ते सणही काय कामाचे होते ज्या सणाच्या दीवसीही पुरणपोळी मिळायची नाही म्हणे.भिमजयंतीला एक चेहर्यावर अलगच खुशी असते.दोघेही भाऊ तयार झालो सकाळी ८:३० वाजताच.भावाची रूम MIT COLLEGE (औरंगाबाद) कडे , तिकडुन निघालो पुतळ्याकडे, जाताना वाटेत रेल्वे पट्री सर्व्याच शहरासारख पट्री च्या बाजुला भिमवाडा आसतो तसाच ईथेही.अर्धाशहराचे घान पाणी गटाराला मिळुन ते गटारे मोठ्या गटार्याला मिळुन नदीसारख सर्वी घान गल्लीच्या बाजुन धीम्मी गतीने धावत होते त्याचा वास येत होता पन त्यांच्या नाकाला सवय झाली होती.त्या गल्लीतुन जंयतीच्या आधल्या दीवसी  जाताना त्या गल्लीतली भिमजयंतीची ऊस्तुकता पाहुन एक कवीताच लिहीली होती.समोर गेल्यानंतर चौकात गंगाधर गाडेची शाळा होती तीथे कीत्येक युवा मंडळी थांबुन होती.तीथे थोड वेळ थांबुन बसस्टॉपला गेलो तीथे एस.टी कर्माचार्यानी भिमजयंतीच्या निमीत्त भाषनाचा कार्यक्रम आणि गायनाचा कार्यक्रम ठेवला होता तीथे बसुन आम्ही नंतर भटगल गेटकडे निघालो तिथे बाबासाहेबाच्या पुतळ्याला वंदन करून तिथेच थोडावेळ बसलो संध्याकाळ झाली होती दोघेही थकलो होतो.सकाळपासुन पायीच फिरन चालु होत.जरी थकलो असलो तरी आम्ही डी.जे शोधत होतो सहा साडे सहाला ईतके लवकर ईकडे डी.जे येनार नाहीत म्हणुन निघालो निराळा बाजाराकडे डी.जे काही दीसेनातच अजुन गल्लीतच होते.पन निळाला बाजर मध्ये आवाजच आवाज चालु होता बाबासाहेबांचे गाने चालु होते.मला वाटले मिरवनुक असतील
तिथे स्टाल होते सर्वे पक्षाचे.निळाला बाजारतल्या रस्त्याच्या कोंट्यापासुन ते शिवाजी महाराज पुतळ्यापर्यत स्टॉलच स्टॉल.
बाळासाहेब आंबेडकराच भारीपच स्टॉल लगेच बाजुला लागुन त्यांच्या भाऊ आंनदराज आंबेडकरांची रीप्बलीकन सरसेनानी.मंग कॉर्नरला मेन ठीकानी BJP  थोडे समोर गेल्यानंतर कॉग्रेस,एम आय एम,राष्ट्रवादी कॉग्रेस,मनसे सर्वेच मोठ्यात मोठ्या आवाजात बाबासाहेबांचे गाने लावुन लाखोंचे स्टॉल ऊभे केले होते.
बाबासाहेबान लोकशाहीत दीलेल्या प्रत्येकाला मताच्या अधिकारामुळे ते लाखोचे स्टेज सजवुन जनतेच मत घेन्यासाठी ते थांबले होते.जत्रेत गेल्यानंतर ते जत्रेतले पोटभरून घेनारे कसे बोलवतात पन्नालाल पन्नालाल,मौत का कुआ असे कीतेक तसेच ईत चालु होत.जत्रेत आपल्याकडे पैसे असतात.  दहाच रूपये असतील तर आपन पाहत नाही आपल्या पोटाच प्रश्न असतो.तो योग्य ठीकानी आपन ऊपयोग करतो
पन ईथे बाबासाहेबन आपल्याला एक माणुस एक मताचा अधिकार दीलय ते सहज आपल्यालाच लुटुन खानार्याला देऊन टाकतो.

तेथुन समोर थोड्या अंतरावर गेल की आठवलेंची (आर.पी.आय.)तच्या बाजुला RPI Democratic, RPI (kamble)  हे स्टेज ईतके जबरदस्त सजले होते कर्लस लाईटींग, फॉऊंटेन,छाती ईतके उंच स्टेज ,त्या स्टेज ला वापलेल कापड रंगीबेंरगी त्यात ठेवलेल्या गौतम बुध्दांच्या मोठ्या मोठ्या मनमोहक मुर्त्या पाहुन दंग झालो तसेच वेगवेगळ्या आकारात मोठाले लाखाचे स्टेज सर्वाचेच सजले होते
 कवाडेची (people's Republican party),बहुजन समाज पार्टी अस्या कीतेक शेकडो बाबासाहेबाच्या नावान चालनार्या पार्ट्या नंतर
संघटनाचेही स्टॉल सुरू झाले दलीत पॅंथर,भीमशक्ती,कोब्रा,पॅंथर सेना,बहुजन,असे कीतेकांच्या संघटाना
ही अख्खा दोनी बाजुचा रस्ता आंबेडकरी संघटनानी आणि पार्ट्यानी भरला होता. आम्ही पाहत पाहत समोर आलो

पन एक्या ठीकानी थांबलो एक स्टेज पाहुन
 कंबराच्या खाली स्टेज शाळेमधी जे बॅच वापरतात तस्याच प्रकारचे बेंच त्यावर अंतरलेली ती जाडीजुडी गुलाबी रंगाची सतरंजी.स्टेजवर प्लॅस्टीकच्या खुर्च्या   दोन खुर्चावर बाबासाहेब आणि गौतम बुध्दांची प्रतिमा
त्या स्टेजवर केस पांढरे झालेले काहीची टक्कल पडलेले थोंडावर हास्य आणि शांतता.
त्यांच्यामांघे जे बॅनर होत त्या बॅनरवरच संस्थापक अध्यष्य नाव वाचुनच सर्वे लाखोचे स्टेज माझ्या नजरेत जळाले
ते स्टेज होत दी बुध्दीस्ट सोसाईटी ऑफ ईंडीया
संस्थापक अध्यष्य -विश्वरत्न बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर

 बाबासाहेबाच्या नावाने चालनार्या संघटना आणि बाबासाहेबाची संघटना
स्व:ता ला आंबेडकरवादी समजनार्या लोकानी काय हालत केलीय बाबासाहेबाच्या संघटनाची.बाबासाहेब संघटीत व्हा म्हनाले होते गटा गटात संघटीत व्हा म्हनाले नव्हते काय विचार करून बाबासाहेबानी संघटना काढल्या असतील.बाबासाहेबानी प्रत्येक निर्नय हे भविष्याचा विचार करूनच घेतला होता.तचे आज ना ऊद्या परीनाम दीसतीलच आणि दीसतही आहेत.जुने दीवस येतील तुम्हच्यावर नाही समाजावर
 तुम्ही तुम्हचा स्वार्थ पाहीलात ( नाव).
सद्या देशात प्रतीक्रांती
बुलेट ट्रेनच्या स्पीडने धावतेय क्रांती करतो म्हणनारे प्रतीक्रातींसाठी पट्री टाकतायेत जे पहील्याद्या तुम्हची घरे नंतर देश नष्ट करत ईथली समता स्वातंत्र बंधुत्व नष्ट करू पाहतय

एक आठवन ठेवा विरोधक हे विभागुन नाहीत एक आहेत हाजारो वर्षापासुन

जय भिम...
- मनोज कोंडीबाराव गायकवाड

Comments

Popular posts from this blog

रान उनाड

सावधान

मातंग समाजाची झेंड्याविषयीची गफलत